सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पदव्या स्वस्त; फक्त ३५० रुपये भरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 02:17 PM2022-06-28T14:17:17+5:302022-06-28T14:18:13+5:30

विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क व एकत्रित दंड १०० रुपये असे एकूण ३५० रुपये घेऊन पदवी प्रमाणपत्र देण्याचे कुलगुरूंचे आदेश

Degrees are currently cheap on the backdrop of Senate elections in Dr.BAMU; Just pay Rs 350 fees, relaxation in fine | सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पदव्या स्वस्त; फक्त ३५० रुपये भरा 

सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पदव्या स्वस्त; फक्त ३५० रुपये भरा 

googlenewsNext

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनो, ३५० रुपये भरा आणि विद्यापीठातून आपले पदवी प्रमाणपत्र घेऊन जा. नाही तर नियमाप्रमाणे दंडाची रक्कम भरल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही. ही संधी विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी ५ जुलैपर्यंतच देण्यात आलेली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरू आहे. मात्र, अनेक पदवीधरांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्जच केलेले नाहीत. त्यामुळे नोंदणीचा टक्का घसरला आहे. यापूर्वी २० जूनपर्यंतच मतदार नोंदणीची मुदत होती. मात्र, अनेक संघटना तसेच इच्छुकांनी ही बाब कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या निदर्शनास आणून देत मुदतवाढीची मागणी केली. तेव्हा ५ जुलैपर्यंत मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली आहे.

दीक्षांत समारंभात पदवी न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी १०० रुपये व त्यापुढील प्रति वर्ष ५० रुपये दंड आकारला जातो. कुलगुरूंनी आता विशेष बाब म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क व एकत्रित दंड १०० रुपये असे एकूण ३५० रुपये घेऊन पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश पदवी विभागाला दिले आहेत.

Web Title: Degrees are currently cheap on the backdrop of Senate elections in Dr.BAMU; Just pay Rs 350 fees, relaxation in fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.