जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मनपा वॉर्ड कार्यालयांत खेटे; कुठे आठ, तर कुठे पंधरा दिवसांची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 05:24 PM2020-11-11T17:24:58+5:302020-11-11T17:30:41+5:30

राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले.

delay in Municipal Ward Offices for Birth and Death Certificates; Where eight, where fifteen days waiting | जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मनपा वॉर्ड कार्यालयांत खेटे; कुठे आठ, तर कुठे पंधरा दिवसांची वेटिंग

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मनपा वॉर्ड कार्यालयांत खेटे; कुठे आठ, तर कुठे पंधरा दिवसांची वेटिंग

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत.

औरंगाबाद : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मनपाच्या वाॅर्ड कार्यालयांकडून मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर कुठे आठ दिवस, तर कुठे पंधरा दिवस वेटिंग आहे. झटपट प्रमाणपत्र हवे असल्यास अर्जावर ‘वजन’ ठेवावे लागते. मात्र, या गंभीर प्रकाराकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. प्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.

मनपाच्या ९ झोन कार्यालयांमध्ये जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याची सुविधा आहे. सर्वाधिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्र महापालिका मुख्यालयातील झोन क्रमांक १ मध्ये देण्यात येतात. अर्ज दाखल केल्यानंतर किमान दहा ते पंधरा दिवस नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले. झोन क्रमांक २ म्हणजेच जुना मोंढा आणि झोन क्रमांक ३ येथील परिस्थिती वेगळी नाही. 

जन्म प्रमाणपत्रात स्पेलिंगची चूक
महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत. अनेक जन्म प्रमाणपत्रात इंग्रजीच्या स्पेलिंगमध्ये चूक करून ठेवण्यात येते. पालकांनी वेळीच चूक निदर्शनास आणून दिल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आणखी पंधरा दिवस वेळ लागतो. ज्या कर्मचाऱ्यांना इंग्रजीचे अजिबात ज्ञान नाही त्यांना या कामावर बसविण्यात आले आहे. अर्जात अचूक स्पेलिंग लिहिलेले असतानाही मूळ प्रमाणपत्रात चुका असतात.

प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अवघड
घाटी रुग्णालयात एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला असल्यास त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे अजून आले नाही म्हणून किमान दोन महिने नागरिकांना महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतरही सहजासहजी प्रमाणपत्र मिळत नाही.  

प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी कार्यालयात आलोय
सकाळपासून झोन क्रमांक एकमधील कार्यालयात येऊन बसलो आहे. जुन्या जन्म प्रमाणपत्रात दुरुस्ती करून हवी आहे. आजच अर्ज दाखल केला आहे. जुने रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरू आहे, असे सांगतात. प्रमाणपत्र दुरुस्त करून कधी मिळेल माहीत नाही.
- शेख जमीर,नागरिक.

दुरुस्तीच्या जुन्या प्रकरणांमुळे वेळ लागतो
अनेक नागरिक पंधरा ते वीस वर्षांनंतर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. पासपोर्ट काढताना अथवा उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे असेल, तर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी येतात. जुने रेकॉर्ड काढून बघण्यासाठी वेळ लागतो. वाॅर्ड कार्यालयांमध्ये कामाचा व्याप प्रचंड आहे.
- नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

Web Title: delay in Municipal Ward Offices for Birth and Death Certificates; Where eight, where fifteen days waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.