पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे पीकविमा भरण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:29 AM2017-07-21T00:29:20+5:302017-07-21T00:33:24+5:30

नांदेड : विमा कंपनीच्या पोर्टलमध्ये होणारे बिघाड, ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अडचणी आदीमुळे पीकविमा भरण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने विलंब होत आहे़ त्या

Delay in pyroima due to technical difficulties in the portal | पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे पीकविमा भरण्यास विलंब

पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे पीकविमा भरण्यास विलंब

googlenewsNext

श्रीनिवास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विमा कंपनीच्या पोर्टलमध्ये होणारे बिघाड, ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अडचणी आदीमुळे पीकविमा भरण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने विलंब होत आहे़ त्यामुळे सीएससी केंद्रावर आजपर्यंत केवळ ६ हजार ६६५ शेतकऱ्यांचा पीकविमा भरल्या गेला आहे़
शेतकऱ्यांच्या सोईसाठी शासनाने आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी) मार्फत गावपातळीवर पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण देणे, पिकाच्या नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच नावीण्यपूर्ण व आधुनिक सामुग्री घेण्यास प्रोत्साहन मिळावे आदी उद्देशाने शेतकऱ्यांना पीकविमा दिला जातो़ प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेच्या माध्यमातून गतवर्षी पावणेआठ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता़ यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा मिळाला़ त्यामुळे यंदा दहा लाख शेतकरी पीकविमा भरतील, असा अंदाज आहे़
शासनाकडून यंदा गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार (महा ई-सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्र) तसेच जिल्ह्यातील कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी)च्या १ हजार ७०० केंद्रावर पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले़ त्यामुळे बँकेच्या रांगा कमी होवून वेळेची बचत होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती़ सीएससी केंद्रावर सेवा उपबल्ध करून दिल्याने अनेक बँका पीकविमा भरून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत़ परिणामी सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे़ जिल्ह्यात १७०० सीएससी केंद्रावर पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले़ मात्र, प्रत्यक्षात ७१० केंद्रावर ही सुविधा उपलब्ध झाली असून त्यातील निम्म्याहून अधिक केंद्रावर अडचणी निर्माण होत आहेत़ दरम्यान, कॉमन सर्व्हीस सेंटर मध्ये पीकविमा भरण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत़ यामध्ये पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, नव्याने झालेले बदल आदीमुळे विलंब होत असल्याचे सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक असलम शेख यांनी सांगितले़

Web Title: Delay in pyroima due to technical difficulties in the portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.