औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:24 PM2018-11-16T23:24:36+5:302018-11-16T23:24:50+5:30

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

 Delete encroachment on Aurangabad-Nagar highway | औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

googlenewsNext

औरंगाबाद-नगर: जागतिक बँक प्रकल्पातर्फे ग्रामपंचायतीना नोटिसा
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.


जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ अहमदनगर अंतर्गत येणाऱ्या या महामार्गावर औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी भागांतील हजारो वाहनांची रात्र-दिवस ये-जा सुरु असते. मात्र, ग्रामपंचायत हद्दीतून जाणाºया या महामार्गावर विविध व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्याकडेला भाजी मंडई, मच्छी मार्केट, गॅरेज, पानटपºया, हातगाड्यावर व्यवसाय करणारे आदीसह अनेकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. याचबरोबर हॉस्पीटल, कापड दुकानदार, दुचाकी व तीन चाकीचे शोरुम असणारे व्यवसायिक आदींनी पार्किंगसाठी जागा न सोडल्यामुळे खरेदीसाठी येणाºया ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.

या महामार्गाच्या दुतर्फा जडवाहनधारक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करीत असल्यामुळे ये-जा करणाºया दुचाकीस्वार, छोटे वाहनधारक व पादचाºयांना जिव मुठीत धरुनच ये-जा करावी लागत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणासाठी जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून वाळूज, पंढरपूर, तिरंगा चौक, सिडकोमहानगर आदी ठिकाणची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली होती.

त्यानंतर जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाºयांनी लोखंडी बॅरिकेटस् व फुटपाथ न उभारल्यामुळे अल्पवधीतच अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. आजघडीला गोलवाडी फाट्यापासून ढोरेगावपर्यंत या महामार्गावर अनेकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच असून रस्ते अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.


ग्रामपंचायतींना नोटीसा
औरंगाबाद-नगर महामार्गालगत वाळूज, पंढरपूर, तीसगाव व वळदगाव, लिंबेजळगाव, ढोरेगाव आदी ग्रामपंचायतीच्या हद्दी आहेत. अपघाताचा धोका टाळण्यासाठी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावे, यासाठी जागतिक बँक प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस.वाय.औटी यांनी या चार ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.


वेळकाढू धोरण
वाळूज परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतून हा महामार्ग गेलेला आहे. गावातील बेरोजगार तसेच विविध व्यवसायिकांनी या महामार्गालगतच्या जागेवरच अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास ग्रामपंचायती वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याची चर्चा आहेत.

Web Title:  Delete encroachment on Aurangabad-Nagar highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.