सीएसआरमधून १०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:16+5:302021-04-18T04:04:16+5:30
मनपा हद्दीत दररोज ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. बाधित रुग्ण हे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल ...
मनपा हद्दीत दररोज ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. बाधित रुग्ण हे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये दीडशे बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. त्यासोबतच महापालिकेकडे ८५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध आहेत. हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विविध कोविड सेंटरमध्ये बसविण्यात आलेले आहेत. कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्यास ऑक्सिजन कॉन्संट्रेटर लावून त्यास ऑक्सिजन पुरविला जातो. सध्या कोविड रुग्णांची ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्याकरिता चार कोविड केअर सेंटरमधील एक हजार बेडला ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
इतर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना तातडीने ऑक्सिजनची गरज भासली तर ऑक्सिजन कॉन्संट्रेटरञकरे गरज भागवली जाऊ शकते. हवेतून ऑक्सिजन तयार कछन कॉन्संट्रेटरद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो. साधारणपणे ५ ते ७ लिटर ऑक्सिजन या मशीनद्वारे मिळू शकते. सध्या महापालिकेकडे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने काही रुग्णांना मेल्ट्रॉन येथे तर काहींना थेट घाटी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. कंपन्यांच्या सीएसआर निधीतून १०० मशीन घेण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाकडून विचार सुरू आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्वच रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा जाणवत आहे. अॅक्टीव्ह रुग्णांच्या १० टक्के रुग्ण हे गंभीर आहेत. त्यातच ५ ते ७ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे सीएसआर निधीतून १०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनची मागणी केली जाणार आहे.