धार्मिक भावना दुखविल्याबद्दल संगीतकारावर कारवाईची मागणी
By Admin | Published: August 31, 2016 12:04 AM2016-08-31T00:04:38+5:302016-08-31T00:37:35+5:30
औरंगाबाद : राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर संगीतकार विशाल ददलानी व तहसीन पुनावाला यांनी आक्षेपार्ह टिपणी केली.
औरंगाबाद : राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर संगीतकार विशाल ददलानी व तहसीन पुनावाला यांनी आक्षेपार्ह टिपणी केली. यामुळे जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या आहेत. या दोघांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सकल जैन समाजाच्या वतीने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले.
शिष्टमंडळात महावीर पाटणी, जी.एम.बोथरा, प्रकाश बाफना, ललित पाटणी, डॉ. शांतीलाल संचेती, रामभाऊ डोसी, विलास साहुजी, रमण साहुजी, क्षीरसागर अण्णा, माणिकचंद गंगवाल, अशोक अजमेरा, अमोल पाटणी, ताराचंद बाफना, विनोद बोकडिया, मदनलाल आच्छा, चांदमल सुराणा, नीलेश सेठी, सुनील सेठी, अमृत साहुजी, जितेंद्र गंगवाल, संजय साहुजी, एम.आर.बडजाते, अशोक गंगवाल, तनसुख झांबड, राजेश मुथ्था, डॉ.प्रकाश झांबड, पंकज अग्रवाल, संजीव लोहाडे, पवन साहुजी, भरत साहुजी, गौरव कासलीवाल, प्रवीण लोहाडे, शंतनू सुराणा, समीर पाटणी, सावन चुडीवाल, संजय पहाडे आदींचा समावेश होता.