ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:04 AM2021-04-03T04:04:36+5:302021-04-03T04:04:36+5:30
------------------ सावत्र बहिणीस मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा वाळूज महानगर : सावत्र बहिणीस शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या सावत्र भावाविरुद्ध एमआयडीसी वाळूज ...
------------------
सावत्र बहिणीस मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : सावत्र बहिणीस शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या सावत्र भावाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली नेवालाल यादव (३२, रा. बजाजनगर) हिचा सावत्र भाऊ मनिष राजपूत याने बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी मनिष राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------
‘महावितरण’चा गलथान कारभार
वाळूज महानगर : वाळूजला ‘महावितरण’च्या गलथान कारभाराला नागरिक व ग्राहक कंटाळले आहेत. गावात सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित होणार असल्याची माहिती ग्राहकांना दिली जात नसल्याची ओरड त्रस्त ग्राहकांतून केली जात आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
--------------------
म्हाडा कॉलनीत मूलभूत सुविधांचा अभाव
वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील म्हाडा कॉलनीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या वसाहतीत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. स्वच्छतेकडे कानाडोळा केला जात असल्याने आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांतून वर्तविली जात आहे.
------------------