रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी ६ हजार रुपये लाचेची मागणी; फौजदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:08+5:302020-12-17T04:24:08+5:30

राजकुमार उत्तमराव चांदणे (दच ५८) असे आरोपी फौजदाराचे नाव आहे. तक्रारदार दोन हवालदार हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. राखीव ...

Demand for bribe of Rs 6,000 for not changing night duty; Faujdara arrested | रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी ६ हजार रुपये लाचेची मागणी; फौजदाराला अटक

रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी ६ हजार रुपये लाचेची मागणी; फौजदाराला अटक

googlenewsNext

राजकुमार उत्तमराव चांदणे (दच ५८) असे आरोपी फौजदाराचे नाव आहे. तक्रारदार दोन हवालदार हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणून आरोपी चांदणे तेथे कार्यरत आहेत. आरोपीने त्यांच्या ड्युटी रात्रपाळीवरुन दिवसपाळी अशी केली. तक्रारदार यांना रात्रपाळीची ड्युटी हवी असल्यामुळे त्यांनी राखीव उपनिरीक्षक चांदणे यांच्याकडे विनंती केली असता चांदणेने त्यांना मनासारखे काम हवे असेल तर प्रत्येकी तीन हजार यानुसार दोघांचे ६ हजार रुपये दरमहा देण्यास सांगितले. तक्रारदार हवालदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चांदणेची तक्रार केली. ८ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक रुपचंद वाघमारे आणि कर्मचाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता आरोपीने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. एसीबीकडे आपली तक्रार झाल्याचा संशय फौजदार चांदणेला आल्याने त्याने लाचेची रक्कम घेतली नाही. दरम्यान, तो रजेवर गेला होता. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शुक्रवारी आरोपीविरुध्द बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर एसीबीच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी उपनिरीक्षक चांदणे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चांदणेची रवानगी हर्सूल कारागृहात केली.

=========

निवृत्तीला उरले होते अवघे काही दिवस

फौजदार चांदणे हा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. त्याने वयाची ५७ वर्षे काही महिने ओलांडली. राखीव निरीक्षक यांची बदली झाल्यामुळे चांदणेकडे पोलीस निरीक्षकपदाचा पदभार होता. यातच त्याने कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू केल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, एसीबीला तक्रार प्राप्त झाल्यामुळे चांदणे शुक्रवारी पकडला गेला.

Web Title: Demand for bribe of Rs 6,000 for not changing night duty; Faujdara arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.