नुकसानग्रस्तांना भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:33 AM2017-08-23T00:33:59+5:302017-08-23T00:33:59+5:30
शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़
अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश भाग जलमय झाला होता. अनेक नगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. महापालिकेने या भागातील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे सत्यपाल सावंत यांनी केली आहे. जिल्ह्यात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. मूग व उडीद काढणीला आला असताना अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडला. पंचनामे करुन प्रति एकर दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचे अध्यक्ष पंकज शिवभगत यांनी केली आहे. महापालिका हद्दीतही नाली उपसा न केल्यामुळे श्रावस्तीनगर, सावित्रीबाई फुलेनगर, सैलाबनगर, खडकपूरा, देगलूरनाका, मिल्लतनगर, गांधीनगर, महेबूब नगर, सखोजीनगर, बालाजीनगर, भीमसंदेश कॉलनी, तेहरानगर, एकबालनगर, इस्लामपूरा, बिलालनगर, महेबूबीया कॉलनी, मुजाहिद चौक, पंचशीलनगर आदी भागात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही प्रति कुटुंब दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शिवभगत यांनी केली.