लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:04 AM2021-07-27T04:04:31+5:302021-07-27T04:04:31+5:30
कायगाव : कोरोनाच्या लसीकरणात राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप थांबवून भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज पाचशे लसीचा पुरवठा करण्यात यावा, अशी ...
कायगाव : कोरोनाच्या लसीकरणात राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप थांबवून भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज पाचशे लसीचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने भेंडाळा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत नरवडे यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना लसीकरण हा सरकारी कार्यक्रम असूनदेखील काही लोक मित्रमंडळाच्या वतीने लसीकरण करत असल्याचे भासवित आहेत. भेंडाळा आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावात रोटेशननुसार पाचशे नागरिकांचे लसीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात यावर अंमलबजावणी झाली नाही तर तिरडी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी भाऊसाहेब शेळके, नितीन पवार, देवीदास पाठे, दत्ताभाऊ परभणे, श्रीकांत जाधव, प्रवीण वडकर, कृष्णा तेलंगे, सचिन प्रधान, भारती तुपे, मीराबाई तुपे आदींची उपस्थिती होती.
---
फोटो : भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत नरवडे यांना निवेदन देताना भाऊसाहेब शेळकेंसह आदी.
260721\img-20210725-wa0030.jpg
प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रहारचे पदाधिकारी.