करिना कपूरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:04 AM2021-07-31T04:04:46+5:302021-07-31T04:04:46+5:30
मसी सेनेचे राज्य सचिव पास्टर अनथोनी लोंढे, उपाध्यक्ष पास्टर अनिल खिल्लारे, मसी सेनेच्या राज्याच्या महिला अध्यक्ष रेखा ...
मसी सेनेचे राज्य सचिव पास्टर अनथोनी लोंढे, उपाध्यक्ष पास्टर अनिल खिल्लारे, मसी सेनेच्या राज्याच्या महिला अध्यक्ष रेखा अनिल खिल्लारे आणि पायल रोहतगी यांनी करिनाचा निषेध केला आहे. तिने तिच्या पुस्तकाच्या नावातून तात्काळ बायबल हा शब्द वागळवा आणि ख्रिस्ती समाजाची जाहीर माफी मागावी. ख्रिस्ती समाज शांतताप्रिय आणि येशूच्या शिकवणीनुसार क्षमा करणारा आहे. मात्र, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखवल्यास समाज सहन करणार नाही. यापूर्वीही धार्मिक भावना दुखवणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्य शासनावर आमचा विश्वास आहे. कोणाकडूनही भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी शासन योग्य ती कारवाई करील, असा आमचा विश्वास असल्याचे मसी सेनेने म्हटले आहे. बहुजन समाज पक्षाचे औरंगाबाद मध्य विधान सभेचे प्रभारी अजयकुमार यादव यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
मसी सेना आणि बहुजन समाज पक्षातर्फे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि छावणी पोलिसांना याबाबतचे निवेदन दिले आहे.