शहरातच नव्हे, ग्रामीण भागांतूनही एसयूव्ही कारसाठी मागणी; किंमती वाढूनही चार महिने वेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 07:38 PM2024-08-27T19:38:16+5:302024-08-27T19:38:57+5:30

एसयूव्ही कारला शहरातील उच्चमध्यमवर्गीय व ग्रामीण भागातील श्रीमंत लोकांकडून मागणी आहे.

Demand for SUV cars not only in cities, but also in rural areas; Four months of waiting despite price increase | शहरातच नव्हे, ग्रामीण भागांतूनही एसयूव्ही कारसाठी मागणी; किंमती वाढूनही चार महिने वेटिंग

शहरातच नव्हे, ग्रामीण भागांतूनही एसयूव्ही कारसाठी मागणी; किंमती वाढूनही चार महिने वेटिंग

छत्रपती संभाजीनगर : भारतीय कार मार्केटमध्ये मागील काही महिन्यांपासून स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही)ची मागणी सातत्याने वाढत आहे. कारण, या गाड्यांमध्ये अगदी पाॅवरफुल इंजिन दिलेले आहे. यामुळे कार निर्मात्या कंपन्या नवनवीन एसयूव्ही बाजारात उतरवित आहेत. आजघडीला अशी परिस्थिती आहे की, काही कंपन्यांच्या काही निवडक एसयूव्ही मॉडेलसाठी ग्राहकांना चार महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

देशात पहिल्या ६ महिन्यांत किती एसयूव्हीची विक्री
महाग असली, तरी एसयूव्ही कार सर्वजण पसंत करीत आहेत. देशात चालू वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत ५२ टक्के वाहने एसयूव्ही विक्री झाल्या आहेत. यावरून लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

शहरातच नव्हे, ग्रामीण भागांतूनही मागणी
एसयूव्ही कारला शहरातील उच्चमध्यमवर्गीय व ग्रामीण भागातील श्रीमंत लोकांकडून मागणी आहे. कारण, एसयूव्ही कार या ग्रामीण भागातील रस्त्यावरही सहजपणे चालते. आता ग्रामीण भागांतही रस्त्याचे जाळे पसरले आहे. त्यांनाही आधुनिक, सुरक्षित व पॉवरफुल इंजिन असलेली कार पाहिजे. ही त्यांची इच्छा एसयूव्ही कार पूर्ण करत आहे.

एसयूव्हीची किंमत १० लाखांपासून पुढे
एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये सर्वात अपडेटेड फीचर्स येत आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो, काही कारमध्ये ८ इंचीचे टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, ७ इंच डिजिटल इन्स्टुमेंट क्लस्टर, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, मागील व्हेंटसह ऑटो एअर कंडिशनिंगदेखील मिळते. वायरलेस फोन चार्जर, एअर प्युरिफायर, जेबीएल स्पीकर, ॲम्बियंट लाइटिंग आणि फॉग लॅम्प अशा सुविधा काही एसयूव्ही मॉडेलमध्ये देण्यात आले आहे. आधुनिक फिचर्समुळे एसयूव्ही १० लाखांपासून पुढील किमतीत मिळत आहे.

एसयूव्हीच्या काही मॉडेलवर चार महिने वेटिंग
एसयूव्ही कारची मागणी निश्चितच वाढली आहे. जिल्ह्यातच नव्हे, तर देशात मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने कंपन्याही एसयूव्ही कारचे नवनवीन मॉडेल लॉंंच करीत आहेत. काही मॉडेल असे आहेत की, त्यांना वेटिंग नाही. मात्र, काही मॉडेलवर आजही चार महिने वेटिंग करावी लागत आहे.
- राहुल पगारिया, कार वितरक.

Web Title: Demand for SUV cars not only in cities, but also in rural areas; Four months of waiting despite price increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.