फ्रांसीलियन स्कूलच्या चाैकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:02 AM2021-07-16T04:02:57+5:302021-07-16T04:02:57+5:30
निवेदनात, पालकांना ठरावीक दुकानातूनच साहित्य घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. पालकसंघ केवळ कागदावर असून, कुठल्याही बैठकीशिवाय शुल्कवाढ करण्यात ...
निवेदनात, पालकांना ठरावीक दुकानातूनच साहित्य घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. पालकसंघ केवळ कागदावर असून, कुठल्याही बैठकीशिवाय शुल्कवाढ करण्यात आली. यावर्षी शाळेत शुल्कवाढ न करण्याचे आदेश असताना शुल्कवाढ केली गेली आहे. तसेच शैक्षणिक शुल्क न भरणाऱ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करीत याची समितीमार्फत चाैकशी करावी. त्यात आढळलेल्या दोषांच्या आधारे शाळेवर कारवाई करण्याची मागणी राजीव जावळीकर, मंगेश साळवे, रितेश देवरे, कार्तिक फरकडे, संदीप राजपूत, गजानन गोमटे, शुभम नवले, प्रद्युम्न पराये, निखिल ताकवाले, किरण साठे, विजय वावरे, विकाश शेजूळ, अक्षय शिंदे, रोहित ढेंगे, मयूर देशमुख, आदींची केली. याविषयी शाळा प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळेकडून प्रतिसाद मिळाला नाही.