साडेबाराशे कोटींच्या निधीची गोदावरी महामंडळाकडून मागणी

By Admin | Published: October 3, 2016 12:24 AM2016-10-03T00:24:09+5:302016-10-03T00:33:37+5:30

औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे जमिनीच्या वाढीव मोबदल्याचे पैसे थकले आहेत.

Demand from the Godavari Mahamandal of Rs | साडेबाराशे कोटींच्या निधीची गोदावरी महामंडळाकडून मागणी

साडेबाराशे कोटींच्या निधीची गोदावरी महामंडळाकडून मागणी

googlenewsNext

औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे जमिनीच्या वाढीव मोबदल्याचे पैसे थकले आहेत. हा मोबदला अदा करण्यासाठी महामंडळाने शासनाकडे तब्बल १२५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच शासनास सादर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिंचन विभागाकडून आतापर्यंत मराठवाड्यात जवळपास २८६ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांसाठी लाखो हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली असून त्या- त्या वेळी संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मूळ मोबदलाही अदा करण्यात आलेला आहे. मात्र मोबदल्याची रक्कम कमी वाटल्याने अनेक शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यातील असंख्य प्रकरणात शेतकऱ्यांना न्यायालयाकडून वाढीव मोबदला मंजूर झालेला आहे.

Web Title: Demand from the Godavari Mahamandal of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.