‘कदम हटाव’ची खैरे गटाची मागणी
By Admin | Published: February 14, 2015 12:07 AM2015-02-14T00:07:14+5:302015-02-14T00:13:35+5:30
औरंगाबाद : शिवसेनेचे उपनेते खा. चंद्रकांत खैरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले रामदास कदम यांच्यातील अंतर्गत संघर्षाने आता उघड रूप घेतले असून, रामदास कदम यांना पालकमंत्री पदावरून हटवावे,
औरंगाबाद : शिवसेनेचे उपनेते खा. चंद्रकांत खैरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले रामदास कदम यांच्यातील अंतर्गत संघर्षाने आता उघड रूप घेतले असून, रामदास कदम यांना पालकमंत्री पदावरून हटवावे, अशी मागणी खैरे यांनी पक्षप्रमुखांकडे केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे महापालिका निवडणूक प्रक्रियेत खैरे यांना फारसे स्थान राहणार नाही, अशी व्यूहरचना पालकमंत्री करीत
आहेत.
कदम आणि खैरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरु आहे. आता पालकमंत्री बदलाची मागणी झाल्याने हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या दोघांतील ‘पाणउताऱ्याचे’ प्रकरण मातोश्रीपर्यंत गेले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवरील गटबाजी उफाळून आल्याने पक्षामध्ये विस्कळीतपणा दिसत आहे.