गारपीटग्रस्त भागात विद्युतपुरवठा चालू करण्याची मागणी

By Admin | Published: June 12, 2014 12:49 AM2014-06-12T00:49:02+5:302014-06-12T01:37:11+5:30

औसा : गारपीटग्रस्त भागातील विद्युतपुरवठा चालू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी आ. दिनकर माने यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास दिले आहे.

Demand for power supply in hailstorm affected areas | गारपीटग्रस्त भागात विद्युतपुरवठा चालू करण्याची मागणी

गारपीटग्रस्त भागात विद्युतपुरवठा चालू करण्याची मागणी

googlenewsNext

औसा : गारपीटग्रस्त भागातील विद्युतपुरवठा चालू करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी आ. दिनकर माने यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास दिले आहे.
मार्च महिन्यात औसा तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. किल्लारी, मोगरगा, तावशी, एकंबी, चिंचोली, जवळगा आदी अनेक गावांतील विद्युत लाईनचे पोल मोडले आहेत. तर तारा तुटल्यामुळे या भागातील विद्युतपुरवठाही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणेदेखील मुश्कील झाले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनदेखील विद्युत महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या उपस्थितीत गारपीटग्रस्त भागातील विद्युतपुरवठा पूर्ववत् सुरू ठेवावा, अशा मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Demand for power supply in hailstorm affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.