शिलेदार कुटुंबियांची संरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:14 AM2017-09-30T00:14:38+5:302017-09-30T00:14:38+5:30
शहरातील कौटुंबिक न्यायालय परिसरात औरंगाबाद येथील हरबनसिंग शिलेदार यांचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून अन्य तिघे मात्र फरार आहेत़ आरोपींकडून कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी मागणी शिलेदार कुटुंबाने केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील कौटुंबिक न्यायालय परिसरात औरंगाबाद येथील हरबनसिंग शिलेदार यांचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून अन्य तिघे मात्र फरार आहेत़ आरोपींकडून कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी मागणी शिलेदार कुटुंबाने केली आहे़
हरबनसिंग शिलेदार यांची मंगळवारी कौटुंबिक न्यायालय परिसरात हत्या केल्याच्या प्रकरणात प्रीतपालसिंघ शिलेदार यांच्या तक्रारीवरुन विक्रमजितसिंघ लिखारी, परमिंदरकौर लिखारी, बलजितसिंघ लिखारी व प्रकाशकौर लिखारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ यातील विक्रमजितसिंघ याला अटक करण्यात आली आहे़, परंतु अन्य तीन आरोपी फरारच आहेत़ घटनेच्या वेळी चारही आरोपी न्यायालय परिसरात होते़