राज्य शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:02 AM2021-07-05T04:02:21+5:302021-07-05T04:02:21+5:30

पुणे येथील फुरसुंगी भागात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. एमपीएससीच्या भोंगळ कारभारामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत औरंगपुरा येथील ...

Demand for registration of homicide case against the state government | राज्य शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

राज्य शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

googlenewsNext

पुणे येथील फुरसुंगी भागात एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. एमपीएससीच्या भोंगळ कारभारामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात रविवारी ओबीसी कृती समितीने निदर्शने केली. सुरुवातीला लोणकर यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी एमपीएससी संयुक्तगट ब पेपरची तारीख जाहीर करा, संयुक्त ग्रुप गट क जाहिरात काढा, निवड झालेल्यांना तत्काळ नियुक्ती द्या, आरोग्य सेवकांचा निकाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्यांचा प्राधान्याने विचार करून सकारात्मक दृष्टिकोनातून सोडव्यात, अन्यथा राज्य शासनाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीचे राज्य समन्वयक दत्तात्रय जांभूलकर यांनी दिला. यावेळी कृती समितीचे महेंद्र मुंडे, तुषार साळुंखे, गजानन पालवे, प्रेम कंकाल, भूपेश कडू, ॲड. कृष्णा घुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Demand for registration of homicide case against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.