पीएम किसान सन्मान निधी लाभार्थींची नोंदणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:04 AM2021-03-29T04:04:56+5:302021-03-29T04:04:56+5:30
केंद्र सरकारने दोन वर्षांपासून आर्थिक कमकुवत शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ...
केंद्र सरकारने दोन वर्षांपासून आर्थिक कमकुवत शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेतील निकषांची पूर्तता केल्यानंतर महसूल विभागाकडे शेतकऱ्यांची संपूर्णपणे इत्थंभूत माहिती उपलब्ध होते. या योजनेचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी मागील वर्षांपर्यंत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे असलेल्या पोर्टलवरून लॉगिन करून माहिती भरली होती. महसूल विभाग व कृषी विभाग या योजनेत संयुक्तपणे काम करीत होते. शेतकऱ्यांची नवीन नोंदणी कृषी विभाग व महसूल विभागाच्या श्रेयवादावरून बंद पडलेली आहे. या श्रेयवादामुळे बंद पडलेली नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांचे नुकसान करू लागले आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन नोंदणी तातडीने सुरू करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर किसान सभेचे तालुकाध्यक्ष बाळा पाटील शिंदे, भाकपचे तालुका सचिव कॉ. बाबूराव पठाडे, कॉ. सय्यद अनिस, माजी नगरसेवक कॉ. शेख बाबूभाई, कॉ. शेख अजीम, केशवराव पाटील ढोरमारे, कॉ. अशोक गायकवाड, शेख इमरान, देवीदास पाटील ढोरमारे, शेख सद्दाम, अन्वर मिर्झा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो : सिल्लोडचे प्रभारी तहसीलदार संजय सोनवणे यांना निवेदन देताना किसान सभेचे पदाधिकारी.