बाजार समितीत पोलीस चौकी उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:04 AM2021-06-27T04:04:47+5:302021-06-27T04:04:47+5:30
यासंदर्भात बाजार समितीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाज्यांच्या अडत बाजारात रात्रभर बेकायदेशीर हॉटेल सुरू असतात. यातील अनेक ...
यासंदर्भात बाजार समितीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाज्यांच्या अडत बाजारात रात्रभर बेकायदेशीर हॉटेल सुरू असतात. यातील अनेक हॉटेल, टपऱ्या अनधिकृत आहेत. तिथे दारू, गांजा आदी नशेचे सामान विक्री होते, असा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला असून, त्यातून चोऱ्या, लुटणे, खून असे प्रकार घडत आहेत. यास रोखण्यासाठी भाजीपाला अडत बाजारात पोलीस चौकी उभारण्यात यावी व त्यात २४ तास पोलीस, कर्मचारी ड्यूटीवर राहतील याची व्यवस्था करण्यात यावी.
अनधिकृत हॉटेल बंद करण्यात यावेत. बाजार समितीने तीन ते चार कॅन्टिनलाच येथे परवानगी द्यावी, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच मोकाट जनावर नुकसान करत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन संघटनेचे अध्यक्ष इसा खान व शिष्टमंडळाने बाजार समिती सचिवांना दिले.