लासूर स्टेशनमधील समस्या सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:02 AM2021-08-25T04:02:27+5:302021-08-25T04:02:27+5:30

निवेदनात म्हटले आहे की, लासूर स्टेशन ही मोठी बाजारपेठ आहे. येथील शासकीय विश्रामगृहाची जागा ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी देण्यात यावी. ...

Demand to solve the problem in Lasur station | लासूर स्टेशनमधील समस्या सोडविण्याची मागणी

लासूर स्टेशनमधील समस्या सोडविण्याची मागणी

googlenewsNext

निवेदनात म्हटले आहे की, लासूर स्टेशन ही मोठी बाजारपेठ आहे. येथील शासकीय विश्रामगृहाची जागा ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी देण्यात यावी. सावंगी-लासूर स्टेशनअंतर्गत ग्रामीण रुग्णालयाला मान्यता देण्यात यावी. हर्सूल गट क्रमांक १ ते ४ पैकी काही क्षेत्र गार्डन करता देण्यात यावे, स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी, आरोग्य उपकेंद्रातील समस्या सोडविण्यात याव्यात. परिसरातील जागेच्या नोंदी भूमिअभिलेख विभागाकडे नोंदविल्या जात नाहीत. व्यापाऱ्यांना विविध बँकांकडून कर्ज घेण्यासाठी पीआर कार्डची गरज असते. मात्र, प्रॉपर्टी कार्ड नसल्याने कोणतीच बँक व्यापाऱ्यांना कर्ज देत नाही. या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मदत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

240821\img-20210824-wa0013.jpg

लासूर स्टेशन ता गंगापूर येथील विवीध समस्या सह अनेक अडचणी सोडवण्यात याव्या यासाठी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना सरपंच मिना संजय पांडव यांनी निवेदन दिले

Web Title: Demand to solve the problem in Lasur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.