सिडको वाळूज महानगरमध्ये टँकरची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:43 PM2019-04-21T21:43:32+5:302019-04-21T21:43:54+5:30

सिडकोला मागणीपेक्षा एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडूनही टँकरला मागणी वाढली आहे.

Demand for tankers in the CIDCO Walaj Mahanagar | सिडको वाळूज महानगरमध्ये टँकरची मागणी वाढली

सिडको वाळूज महानगरमध्ये टँकरची मागणी वाढली

googlenewsNext

वाळूज महानगर : सिडकोला मागणीपेक्षा एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. पाण्यासाठी ओरड होत असल्याने अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडूनही टँकरला मागणी वाढली आहे.


सिडकोवाळूज महानगरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सिडको एमआयडीसीकडून ४.५ एमएलडी पाणी विकत घेवून नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करते. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे जवळपास १ एमएलडी पाण्याची कपात करण्यात आली आहे. महानगर १ व २ मधील अनेक नागरी वसाहतींना आठवड्यातून एकदा तेही कमी दाबाने मिळत पाणी आहे. काही वसाहतीला तर मागणी करुनही अजून प्रशासनाने नळजोडणीच दिलेली नाही. त्यामुळे सिडकोतील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाळूज महानगर २ मधील साऊथसिटी व एमआयजी भागातील नागरिकांनी लागोपाठ दोन दिवस मोर्चा काढत पाणीप्रश्नावरुन सिडकोच्या अभियंत्यांना धारवेर धरले होते. ज्या भागाला कमी दाबाने पाणी मिळते व ज्या भागाला पाणी मिळत नाही. त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांमधून टँकरची मागणी वाढली आहे.


खाजगी टँकरचालकांची चलती
सिडको वाळूज महानगराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच दुष्काळामुुळे एमआयडीसीकडून मिळणारे पाणीही कमी मिळत आले. त्यामुळे प्रशासनाने महानगर १ व २ मधील अनेक सोसायट्यांना टँकरने पाणी दिले जात आहे. तसेच पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनीही खाजगी टँकरचा आधार घेतला आहे. प्रशासनाकडून व खाजगी पाणी व्यवसायिकांकडून सर्रास टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Web Title: Demand for tankers in the CIDCO Walaj Mahanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.