गरिबांऐवजी धनदांडग्यांची नावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:21 PM2017-11-17T23:21:21+5:302017-11-17T23:21:37+5:30
घरकुलांसाठी शासनाने सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार तयार केलेल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये धनदांडग्यांची नावे आल्याने ती न वगळता नमुना ड भरून त्यात गोरगरिबांची नावे टाकण्यात आली होती. मात्र आता ही यादीच पंचायत समितीत धूळखात पडल्याने एकाही गावातील या लाभार्थ्याला घरकुल मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. याबाबत राकॉंचे तालुकाध्यक्ष माधव कोरडे यांनीही प्रशासनाकडे तक्रार करून यातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
हिंगोली : घरकुलांसाठी शासनाने सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार तयार केलेल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये धनदांडग्यांची नावे आल्याने ती न वगळता नमुना ड भरून त्यात गोरगरिबांची नावे टाकण्यात आली होती. मात्र आता ही यादीच पंचायत समितीत धूळखात पडल्याने एकाही गावातील या लाभार्थ्याला घरकुल मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. याबाबत राकॉंचे तालुकाध्यक्ष माधव कोरडे यांनीही प्रशासनाकडे तक्रार करून यातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
प्रायोरिटी लिस्टमधील लाभार्थ्यांची संवर्गनिहाय यादी जाहीर झाल्यानंतर नमुना डमध्ये प्राप्त अर्जांचे सर्वेक्षण करून ही यादी समितीसमोर सादर करून अंतिम करण्यास सांगण्यात आले होते. यासाठी ५0 हजारांच्या आसपास अर्ज आल्याचे सांगितले जात होते. मात्र यासाठी एक महिन्याची मुदत दिलेली असताना १८ महिने उलटून गेल्यावरही कोणतीच प्रक्रिया झाली नाही. गटविकास अधिकाºयांनीही वरिष्ठांच्या सूचना नसल्याचे सांगून याद्या लाल फितीत अडकविल्या. मात्र प्रायोरिटी लिस्टमध्ये केवळ ११ हजार लाभार्थीच आले होते. त्यातही अल्पसंख्याकचे उद्दिष्ट तर पहिल्याच वर्षी संपले. आता यंदा या संवर्गातील लाभार्थी निवडायचा कसा? हा प्रश्न आहे. यासाठी यंदा १५४ एवढे उद्दिष्ट आहे. तर रमाई आवास व राज्याच्या इतर घरकुलांसाठीही लाभार्थी नमुना डमधून अंतिम झालेले लाभार्थी निडण्यास शासनाने सांगितले. मात्र तरीही हिंगोली जिल्ह्यात ही यादी अंतिम नाही.
पत्रच माहिती नव्हते
आॅगस्ट २0१४ मध्ये अवर सचिव असिम गुप्ता यांनी दिलेल्या पत्रात प्रायोरिटी यादी व विषय ड यादीवर काय कारवाई करायची याची माहिती होती. यात प्रायोरिटी यादी झाल्यानंतर या यादीत नसणाºया परंतु प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेसाठी ग्रामसभेने ड यादीत सुचविलेल्या नवीन लाभार्थ्यांच्या याद्या तालुका समितीने छाननी व आवश्यकतेनुसार स्थळतपासणी करून जिल्हा समितीमार्फत एक महिन्यात अंतिम करण्यास सांगितले होते.मात्र अशा समित्यांचीही स्थापना नाही अन् हे पत्रही माहिती नव्हते.
काम सुरू
या याद्यांवर आता पंचायत समित्यांनी काम सुरू केल्याचे प्रकल्प संचालक मुकीम देशमुख यांनी सांगितले.