नोटाबंदीविरोधात निदर्शने

By Admin | Published: January 7, 2017 12:01 AM2017-01-07T00:01:52+5:302017-01-07T00:03:16+5:30

बीड : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने व सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली

Demonstrations against Nomad | नोटाबंदीविरोधात निदर्शने

नोटाबंदीविरोधात निदर्शने

googlenewsNext

बीड : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाविरोधात तसेच त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची नि:पक्षपातीपणे चौकशी करून झालेल्या नुकसानीची नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने व सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता.
या प्रसंगी केंद्रीय पक्ष निरीक्षक दिग्विजयसिंग यांनी नेतृत्व केले. जिल्हा प्रभारी शिवाजीराव पाटील कव्हेकर, सहप्रभारी प्रा.सत्संग मुंडे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ.डॉ.नारायण मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टी.पी.मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक हिंगे, महिला प्रदेश चिटणसि जयश्री पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पांडुळे, महादेव धांडे, फरीद देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, नोटाबंदी हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे. नोटाबंदी करण्याअगोदर सरकारने पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे देशातील शेतकरी, कामगार, व्यापारी व सामान्य जनतेवर खऱ्या अर्थाने सर्जिकल स्ट्राईक झाले आहे. देशातील परिस्थिती सुरळीत न झाल्यास सामान्य जनता सरकारला माफ करणार नाही अशी टीका त्यांनी केली. सामान्यांची अडवणूक करून सरकारला काय साध्य करायचे आहे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे पन्नास दिवसांत दीडशेपेक्षा जास्त नागरिकांचा बँकेतील रांगेत मृत्यू झाला आहे. त्यांना शासनाने योग्य तो मोबदला द्यावा व नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यावा; या प्रश्नी पक्षातर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी अ‍ॅड.सुरेश हात्ते, महादेव मुंडे, सीताराम गव्हाणे, नवनाथ थोटे, एनएसयूआय चे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, ग्रंथालय विभागाचे विठ्ठल जाधव, ओबीसी सेलचे गणेश राऊत, एस. सी. सेलचे गोविंद साठे, सेवादलाचे शहादेव हिंदोळे, कुंदाताई काळे अ‍ॅड. डोईफोडे, हरिभाऊ सोळंके, डॉ.सुनील नागरगोजे, युवराज कोकाटे, अ‍ॅड. विनोद निंबाळकर, रामेश्वर जाधव, राणा चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations against Nomad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.