डाव्या, लोकशाहीवादी पक्ष-संघटनांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:04 AM2021-06-27T04:04:17+5:302021-06-27T04:04:17+5:30
नंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रपतींना व मुख्यमंत्र्यांना वेगवेगळी निवेदने त्यांच्यामार्फत पाठवण्यात आली. केंद्र ...
नंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रपतींना व मुख्यमंत्र्यांना वेगवेगळी निवेदने त्यांच्यामार्फत पाठवण्यात आली. केंद्र सरकारने तीन कृषीविरोधी कायदे मंजूर केल्यानंतर हे तीनही कायदे तातडीने रद्द करावेत व शेतमालास किमान भावाची हमी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करीत असून, या आंदोलनास आज सात महिने पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. साथी सुभाष लोमटे, कॉ. प्रा. राम बाहेती, कॉ. भगवान भोजने, कॉ. भीमराव बनसोड, कॉ. बुद्धिनाथ बराळ, प्रा. उमाकांत राठोड, श्रीकांत फोपसे, लोकेश कांबळे, सत्यजित मस्के, अण्णासाहेब खंदारे आदींनी निदर्शनात सहभाग घेतला.