वाहतूक सुरळीत करण्यासाठी निदर्शने

By Admin | Published: May 14, 2014 12:03 AM2014-05-14T00:03:00+5:302014-05-14T00:28:19+5:30

अंबाजोगाई: वाढते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात अशा विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

Demonstrations to smooth traffic | वाहतूक सुरळीत करण्यासाठी निदर्शने

वाहतूक सुरळीत करण्यासाठी निदर्शने

googlenewsNext

अंबाजोगाई: शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करा, तसेच रस्त्यावर होणारी पार्किंग यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात अशा विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अंबाजोगाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे व प्रादेशिक परिवहन विभागाच्या निष्काळजीपणामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील मेडिकल कॉलेज ते भगवानबाबा चौक, यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते सायगाव नाका, अशा शहरातील मुख्य रस्त्यावर अवैध वाहतूक करणारी वाहने पार्किंग केली जातात. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर आॅटो रिक्षा, जीप उभ्या असल्यामुळे शहरवासियांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. लहान मोठे अपघात मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरात तीन हजारांपेक्षाही जास्त अ‍ॅटो रिक्षा असून अॉटो रिक्षांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शिवाजी चौक, सावरकर चौक, पंचायत समिती, बसस्थानक परिसर, तहसील कार्यालय, पाटील चौक, मंडी बाजार, नगर परिषद परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी परवानगी नसतांनाही मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच दुचाकी वाहनांची पार्किंग केले जाते. या प्रकरणी पोलिस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत आदनाक, शहरप्रमुख श्रीधर गरड, उपशहरप्रमुख अर्जुन जाधव, अक्षय भूमकर, नितीन चौधरी, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) ठोस उपाययोजनांची मागणी रस्त्यावरील अवैध पार्किंग, यामुळे होणारे अपघात रोखण्याची आंदोलनकर्त्यांनी केली मागणी. रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्यामुळे रस्ता अरुंद होत असून, यामुळे वाहतुकीची कोंडी बनतेय डोकेदुखी. वाहतूक सुरळीत करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी.

Web Title: Demonstrations to smooth traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.