शहरातील अनेक भागांत डेंग्यूचा उद्रेक
By Admin | Published: September 4, 2016 12:58 AM2016-09-04T00:58:15+5:302016-09-04T01:05:55+5:30
औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते.
औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळले. यामध्ये एकट्या औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या ३५ आहे. तर ग्रामीण भागात अवघे ९ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.
एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मनपा, आरोग्य विभागातर्फे विविध भागांमध्ये कोम्ब्ािंग आॅपरेशन हाती घेण्यात आले. त्यासाठी खास पथक तयार करण्यात आले. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्या ठिकाणी हे शक्य होत नाही, त्या ठिकाणी अॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले.
याशिवाय शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जोखमीच्या वसाहतींसह उच्चभ्रू वसाहतींमधील रहिवाशांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले.
जुलै, आॅगस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण
पावसाला सुरुवात होत नाही, तोच साथरोगांचा फैलाव सुरू झाला. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण समोर आले. केवळ आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे शहरात १० तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले.
धूरफवारणी, अॅबेट टाकणे, कंटेनर सर्वेक्षण यासह जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा स्वच्छ क रून कोरडे केले पाहिजे. शिवाय पाण्याचे साठे योग्य पद्धतीने झाकून ठेवावेत. नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
- अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी