रामनगरातील शाळेजवळ डेन्स फॉरेस्ट लागले वाढीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:04 AM2021-04-24T04:04:41+5:302021-04-24T04:04:41+5:30
२००० स्वे. मीटर क्षेत्रावर २०१९-२० मध्ये हे फॉरेस्ट तयार झाले. शाळेच्या इतक्या जवळ जंगल तयार झाले आहे की, पटांगणात ...
२००० स्वे. मीटर क्षेत्रावर २०१९-२० मध्ये हे फॉरेस्ट तयार झाले. शाळेच्या इतक्या जवळ जंगल तयार झाले आहे की, पटांगणात मुलांनी खेळायचे कसे, याची चिंता आता पालकांना सतावते आहे. सध्या विद्यार्थी शाळेत येत नाहीत; पण शाळा नियमित सुरू झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षेकडे शाळेला जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कारण शाळा आणि जंगल यामध्ये साधे तार कंपाऊंडही तयार केलेले नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका निवेदनाद्वारे सामाजिक वनीकरण विभागाला संपर्क करून याविषयी चिंता व्यक्त केली आहे. शाळेचे प्रशासन पटांगणात गवत वाढू नये, यासाठी निंदणी-खुरपणी करून पटांगण स्वच्छ ठेवत असते. या डेन फॉरेस्ट मध्ये सहा हजार विविध झाडे लावली असून, संबंधित विभागाचे या फॉरेस्टकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो : रामनगर शाळेजवळ वाढीला लागलेले घनवन.
230421\datta moraskar_img-20210331-wa0036_1.jpg
रामनगर शाळेजवळ वाढीला लागलेले घनवन.