औद्योगिक क्षेत्रात ‘घनदाट’ वनोद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:05 AM2021-07-11T04:05:36+5:302021-07-11T04:05:36+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात ज्या ठिकाणी कचरा टाकून परिसर दुर्गंधीयुक्त केला जात होता, त्याच ठिकाणी घनदाट वनोद्यानासाठी लघु ...
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात ज्या ठिकाणी कचरा टाकून परिसर दुर्गंधीयुक्त केला जात होता, त्याच ठिकाणी घनदाट वनोद्यानासाठी लघु उद्योजक सरसावले आहेत.
कोरोना काळात रुग्णांना ॲाक्सिजनचा प्रश्न सातत्याने भेडसावला आणि सामान्य व्यक्तीपासून ते सर्वच स्तरापर्यंत वृक्ष आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत याचा अर्थच जणू उमजला असल्याचे चित्र तयार झालेले आहे. अनेकजण धार्मिक विधी किंवा इतर शुभमंगल प्रसंगीदेखील रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत करीत आहेत. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांमुळे प्रदूषण होऊन त्रास होऊ नये म्हणून अनेक ग्रीन बेल्ट एमआयडीसीने सोडलेले आहेत. परंतु त्यावर केरकचरा टाकून परिसर अस्वच्छ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उद्योजकांच्या लक्षात आले.
गत वर्षापूर्वी तयार केलेल्या तलावात चांगल्या क्षमतेने पाणी साठले होते. येथे पक्ष्यांचे वास्तव्य होते. हिरवळ पसरल्याने या परिसरात चिवचिवाट, पक्ष्यांचे मंजूळ आवाज ऐकू येत होते. लॉकडाऊनमुळे पक्ष्यांना कोणताच अडथळा नव्हता, येथे अधिक वृक्ष लागवड करून घनदाट वृक्ष लागवडीची संकल्पना लघु उद्योजकांनी बाळगली.
जोरदार तयारी पूर्व घनदाट उद्यानाची...
जूनपासून उद्योजकांनी
पावसाळ्यात पाणी वाहून वाया जाऊ नये म्हणून परिसरातील तळ्याला दगडाचे बांधकाम केले, गतवर्षीच्या पावसात तलाव फुटून अर्ध्याहून जास्त पाणी वाहून गेलेले होते. चाैरस बाजूने झाड लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वनोद्यान तयार करण्याचे प्रत्येक काम वाटून दिले असून, त्यापद्धतीने लघुउद्योजक कामाला लागले आहेत.
साडे तेरा हजार झाडांची लागवड...
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात घनदाट वृक्ष लागवडीसाठी १३, ५०० झाडाचे नियोजन असून, सध्या ३५०० झाड असून, एकूण झाडे औद्योगिक क्षेत्राची शान वाढविणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्योजक जोरदारपणे कामाला लागले आहेत. असे मासिकाचे अध्यक्ष नारायण पवार, उपाध्यक्ष किरण जगताप, जनसंपर्क अधिकारी राहुल मोगले यांनी सांगितले.
कॅप्शन... चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात याच ठिकाणी घनदाट वृक्ष लागवड प्रकल्प राबविला जाणार आहे,त्याची तयारी करण्यात येत आहे.