गोदाकाठच्या जमिनीचे भावही निम्म्यावर
By Admin | Published: May 12, 2017 11:31 PM2017-05-12T23:31:00+5:302017-05-12T23:33:33+5:30
तलवाडा : मागील ४ वर्षांच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीला घरघर लागली असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात आहे.
राजेश राजगुरू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तलवाडा : मागील ४ वर्षांच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीला घरघर लागली असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात आहे. मागील सहा महिन्यांत तालुक्यात जमीन खरेदीविक्रीचे केवळ १२ ते १४ व्यवहार होतात. भाव पडल्याने शेतकरी जमिनीचा व्यवहार करायला तयार नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे.
गेवराई तालुक्यातील गोदाकाठची शेती हिरवा पट्टा म्हणू ओळखले जायचे; पण तीन वर्षांच्या सलग दुष्काळाने हा पट्टाही भकास झाला आहे. पाण्याअभावी पिकेच न आल्याने या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. जमिनीस कवडीमोल भाव मिळत असूनही कोणी जमीन विकत घेण्यास तयार नाही.
सुपीक व पाणी ऊपलब्धतेमुळे या भागातील जमीनीचे दर २००९-१० साली जमीनीचे भाव गगनाला भिडले होते. रस्त्यालगत जमिनीला एकरी १०-१२ लाख, कच्चा रस्ता व पाणी असलेल्या जमिनीस ८-१० लाख रु पये आणि कोरडवाहू जमिनीस ६-८ लाख रु .एकरी असा दर होता; परंतु गेल्या काही वर्षांपासून सलग दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी,अशा कारणाने उत्पन्नात झालेली मोठी घट, मजुरांचे वाढलेले दर यामुळे शेती परवडत नसल्याची मानसिकता तयार झाल्याने शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. परिणामी शेतीचे दरही गडगडले आहेत.
१०-१२ लाखांनी विकणारी जमीन थेट ६ लाख रूपयांवर आली आहे.तर कोरडवाहू जमिनीला तर ३-४ लाख रुपये असा दर मिळत असल्याचे चित्र आहे.