संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आषाढी सोहळ्यासाठी प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:21+5:302021-07-02T04:04:21+5:30
पालखी पुढील १८ दिवस श्री. संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आज पालखी मार्गावर ...
पालखी पुढील १८ दिवस श्री. संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आज पालखी मार्गावर अंगणात उभे राहून नागरिकांनी दुरुनच पालखीचे दर्शन घेऊन पुष्पवृष्टी केली. सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा रद्द झाल्याने सोहळ्यासोबत नियमित वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मात्र मोठी रूखरूख लागल्याचे दिसून आले.
रघुनाथ महाराज पालखीवाले व मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत भानुदास एकनाथ अशा गजरात गावातील नाथ मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर थोडावेळ विसावा घेऊन पालखी बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, नगराध्यक्ष सुरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, मुख्याधिकारी संतोष आगळे, अरूण काळे, दिनेश पारीख, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, महेश जोशी, श्रीकृष्ण कुलकर्णी, चंद्रकांत आंबिलवादे, सुरेश गायकवाड, विलास पोहेकर, समीर शुक्ल, सिद्धार्थ परदेशी, बंडू आंधळे, वैभव पोहेकर, सुरेश गायकवाड, गौतम बनकर, रमेश लिंबोरे यांची उपस्थिती होती.
----
आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला
संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी कर्नाटक (अनागोंदीच्या) राजाकडून पंढरपूर येथील मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती परत आणून पंढरपूर येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली असल्याचा इतिहास आहे. भानुदास महाराजांची पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात समाधी असून, याच कारनाने नाथ महाराजांच्या पालखीस आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान मिळालेला आहे. शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.
--
फोटो
010721\img_20210701_170349.jpg
टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात गावातील नाथमंदिरातून संत एकनाथ महाराजंच्या पादुका असलेल्या पालखीचे प्रस्थान झाले.( छाया... आशीष तांबटकर)