३ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:22 AM2017-08-27T00:22:20+5:302017-08-27T00:22:20+5:30
गणेशोत्सव आणि आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील आणखी तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे़ आतापर्यंत जवळपास दहापेक्षा अधिक आरोपींवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गणेशोत्सव आणि आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील आणखी तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे़ आतापर्यंत जवळपास दहापेक्षा अधिक आरोपींवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे़
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे़ त्यानंतर दुर्गादेवी स्थापना आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे़ त्या अनुषंगाने जिल्ह्यात जबरी चोरी करणारे, खंडणीखोर, दहशत पसरविणारे आरोपी आहेत़ त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास कुणीही समोर येत नाही़ त्यांच्यावर यापूर्वी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही़ त्यामुळे भविष्यात अशा लोकांकडून शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात येते़ जिल्ह्यात आतापर्यंत दहाहून अधिक आरोपींना पोलिसांनी हद्दपार केले आहे़
त्यात आता हदगाव येथील असलम उमर चाऊस, कंधार तालुक्यातील कुरुळाचा रमेश उद्धव गोमारे आणि रावसाहेब विठ्ठल टोंपे या तिघांना हद्दपार करण्यात आले़
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़ संदीप गुरमे, पोना शिवाजी शिंदे, पोनि़ लटपटे, सपोनि भारती यांनी ही कारवाई केली आहे़