अनामत रक्कम मिळालीच पाहिजे
By | Published: December 5, 2020 04:07 AM2020-12-05T04:07:18+5:302020-12-05T04:07:18+5:30
आंदोलनात रिपाई आठवले गटाने सक्रिय सहभाग घेतला.जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, विजय मगरे,शरद किर्तीकर, दीपक सदावर्ते,जावेद सय्यद आदींनी आमदार बंब ...
आंदोलनात रिपाई आठवले गटाने सक्रिय सहभाग घेतला.जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, विजय मगरे,शरद किर्तीकर, दीपक सदावर्ते,जावेद सय्यद आदींनी आमदार बंब यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. दरम्यान मनसेचे संतोष जाधव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी डीआएटी मुंबई न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकरी,सभासद,ऊस उत्पादकांनी २०११ ते २०१३ या कार्यकाळात भरलेल्या अनामत रकमा न्यायालयाने कारखान्यास परत केल्या. संबंधितांना त्या रकमा परत करण्याचे आदेश आले होते. या रकमा परत करण्याची प्रक्रिया कारखान्याने सुरू केली असता राजकीय दबावापोटी आ. प्रशांत बंब यांच्यासह इतरांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत व शेतकऱ्यांचे बँक खाते गोठविण्यात आले,ते तत्काळ खुले करण्यात आले पाहिजेत. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी कारखाना वाचविण्यासाठी एक रूपयाचेही योगदान दिले नाही. उलट त्यांच्याच काळात कारखाना कर्जबाजारी होऊन बंद पडला,असा आरोप संतोष जाधव यांनी केला आहे.