बँकेच्या निष्काळजीपणाने शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:05 AM2021-02-12T04:05:07+5:302021-02-12T04:05:07+5:30

लाडसावंगी परिसरातील भोगलवाडी, शेलूद, चारठा, हातमाळी, औरंगपूर, पिंपळखुंटा आदी गावांत अतिवृष्टी अनुदानाचा धनादेश जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामीण बँकेत ...

Deprived of farmer subsidy due to bank negligence | बँकेच्या निष्काळजीपणाने शेतकरी अनुदानापासून वंचित

बँकेच्या निष्काळजीपणाने शेतकरी अनुदानापासून वंचित

googlenewsNext

लाडसावंगी परिसरातील भोगलवाडी, शेलूद, चारठा, हातमाळी, औरंगपूर, पिंपळखुंटा आदी गावांत अतिवृष्टी अनुदानाचा धनादेश जिल्हा मध्यवर्ती बँक व ग्रामीण बँकेत ३ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आला. मात्र बँकांनी तो अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला नसल्याने शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे उत्पादन अद्याप हाती आले नाही. शिवाय शासनाचे अनुदान मिळाले नाही. याविषयी लाडसावंगी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संपर्क साधला असता, बँकेत दोन कर्मचारी आहेत. आणखी दोन जागा रिक्त आहेत. एका कर्मचाऱ्याला दररोज औरंगाबाद शहरात कॅश आणण्यासाठी जावे लागते. यात दुपार होते. पैसे वाटण्यात बँकेची वेळ संपते. आम्ही जास्त काळ बँकेत बसून दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Deprived of farmer subsidy due to bank negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.