देवेंद्र फडणवीस राजनाथसिंहांच्या पाया पडले; मुख्यमंत्री शिंदेंचाही वाकून नमस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 10:30 AM2023-05-15T10:30:54+5:302023-05-15T11:26:11+5:30

रेल्वे स्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते.

Deputy Chief Minister Devendra Fadanvis held Rajnath Singh's feet; Named as 'younger brother' of Fadnavis | देवेंद्र फडणवीस राजनाथसिंहांच्या पाया पडले; मुख्यमंत्री शिंदेंचाही वाकून नमस्कार

देवेंद्र फडणवीस राजनाथसिंहांच्या पाया पडले; मुख्यमंत्री शिंदेंचाही वाकून नमस्कार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यात चीन व पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांना आरपारचा इशारा दिला असून वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे, असेही ठणकावले आहे. भारताला जो छेडेल, त्याला सोडणार नाही, अशा शब्दात राजनाथसिंह यांनी विरोधी राष्ट्रांना इशारा दिला. यावेळी भाषणाच्या सुरुवातीली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख करताना, मेरे छोटे भाई असं म्हटले. तर, फडणवीसांनीही त्यांचे पाय धरल्याचं दिसून आलं.  

रेल्वे स्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. त्यांनी जमलेल्या हजारो जनसमुदायाला 'ए मेरे कुटुंब के लोगो' या शब्दांत साद घातली. तर, शिंदे-फडणवीस सरकारचं आणि त्यांच्या जोडीचंही कौतुक केलं. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना, मेरे छोटे भाई और महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री असे सिंह यांनी म्हटले. सिंह यांनी देवेंद्र फडणवीसांना छोटे भाई म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात आता याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख असाच, माझा लहान भाऊ म्हणून केला होता. त्यामुळे, राजनाथ सिंह यांनी फडणवीसांचा लहान भाऊ असा उल्लेख करत त्यांच्याशी असलेली जवळीकच दाखवून दिलीय. 

दरम्यान, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्यावतीने राजनाथ सिंह यांचा सत्कार करण्यात आला. तर, राजनाथ सिंह यांच्याहस्तेही शिंदे-फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी खाली वाकून, पाय धरुन राजनाथ सिंह यांचे आशीर्वाद घेतले. फडणवीसांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खाली वाकून राजनाथ सिंहांना नमस्कार केला.   

... तर कोणालाच सोडणार नाही- सिंह

ते म्हणाले, आजदेखील हल्दी घाटी असेल की गलवान घाटी. शत्रूंच्या कारवायांपुढे भारताची मान ना कधी झुकली, ना यापुढे कधी झुकणार शेजारील चीन राष्ट्राने गलवान घाटीत जे केले, ते संतापजनक होते. आम्ही कोणाला छेडणार नाही, पण जो कोणी आम्हाला छेडेल, त्याला सोडणार नाही, हा आपला संकल्प आहे. ही प्रेरणा आम्हाला महाराणा प्रतापसिंह यांच्यापासून मिळाली.

देवेंद्र फडणवीस बनले नाईट वॉचमन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे येईपर्यंत नाइट वॉचमनची भूमिका मीच साकारणार असल्याचे वक्तव्य करताच संमेलनस्थळी एकच हशा पिकला. समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने ते घोषणा करणारच होते की तेवढ्यात मुख्यमंत्री आले, समाजाच्या आर्थिक महामंडळाची घोषणा मुख्यमंत्री करतील. असे सांगून त्यांनी भाषण आवरते घेतले. 

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadanvis held Rajnath Singh's feet; Named as 'younger brother' of Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.