कारवाईऐवजी मंत्र्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हतबल उपमुख्यमंत्री: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 02:55 PM2022-11-08T14:55:16+5:302022-11-08T14:55:28+5:30

राज्यातील प्रश्न सुटत असेल तर खुशाल छोटा पप्पू म्हणा

Deputy Chief Minister Devendra Fadnavis backing ministers, instead of taking action saves ministers : Aditya Thackeray | कारवाईऐवजी मंत्र्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हतबल उपमुख्यमंत्री: आदित्य ठाकरे

कारवाईऐवजी मंत्र्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हतबल उपमुख्यमंत्री: आदित्य ठाकरे

googlenewsNext

वाळूज ( औरंगाबाद) : राज्यातील मंत्रीच महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करीत असून गृहमंत्री कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. खोके सरकारमधील मंत्र्यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गप्प बसल्याने आश्चर्य वाटत असल्याचेही आदित्य म्हणाले. 

बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आयोजित या जनआक्रोश मेळाव्याला प्रमूख पाहुणे म्हणून युवा नेते वरुण सरदेसाई, ज्येष्ठनेते विनोद घोसाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, आ.उदयसिंग राजपुत, जिल्हाप्रमूख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमूख बाळासाहेब गायकवाड, नंदकुमार घोडले आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असून देश-विदेशातील उद्योजक गुंतवणुक करण्यास तयार आहेत. मात्र,  राज्यातील घटनाबाह्य सरकारमुळे महत्वाचे प्रकल्प इतर राज्यात पळविले जात आहेत. एका राक्षसी व्यक्तीच्या महत्वकांक्षेमुळे राज्याचे वाटोळे होत असल्याची टीका आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेता केली. 

साडे सहा कोटी रुपयाची गुंतवणुक असणारा वेंदात प्रकल्प तसेच फोक्स वॅगन, टाटा एअर बस, बल्क ड्रग्स प्रकल्प हे हजारो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प घटनाबाह्य सरकारमुळेच राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी लगावला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत या दोघांचे नाव न घेता राज्यातील बेरोजगार तरुण, शेतकरी व जनतेची दिशाभुल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मेळाव्याला उपजिल्हा प्रमूख बप्पा दळवी, माजी सरपंच सचिन गरड, सागर शिंदे, विजय सरकटे, ददत्तात्र्य वर्पे, मिरा पाटील, अनिता डहारिया आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

राज्यातील प्रश्न सुटत असेल तर खुशाल छोटा पप्पू म्हणा
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे माझा सतत छोटा पप्पू म्हणून उल्लेख करीत आहेत. माझे नामकरण छोटा पप्पू केल्याने राज्यातील बेरोजगार तरुण, शेतकरी व जनतेचे प्रश्न सुटत असतील तर कृषी मंत्री सत्तार यांनी मला खुशाल छोटा पप्पू म्हणावे अशी उपरोधिक टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली. खा. सुप्रिया सुळे असो किंवा कोणतीही महिला असो आक्षेपार्ह भाषा बोलणाऱ्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis backing ministers, instead of taking action saves ministers : Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.