उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:58 PM2017-11-23T23:58:49+5:302017-11-23T23:58:53+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.

 Deputy Director of Police | उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात

उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.
शासनाच्या भांडार तपासणी पथकाने समोर आणलेल्या माहिती आधारे लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी याप्रकरणी औषधी खरेदीच्या नोंदी मागविल्या असून, वेळप्रसंगी याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ती औषधी कुठेही खरेदी होवो, कालबाह्य औषधीमुळे नुकसान तर होणारच आहे, कंपनी बदलून देणार असेल तर ठीक आहे. अन्यथा याप्रकरणात चौकशी केली जाईल, असे कदम यांनी नमूद केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड म्हणाले, त्या खरेदीचा आणि मिनी घाटीचा काहीही संंबंध नाही. त्यावर पालकमंत्री संतापून म्हणाले, संबंध असो किंवा नसो खरेदीच्या नोंदी पाहाव्या लागतील.
चिकलठाणा परिसरात नव्याने उभारलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला आवश्यक असणाºया साहित्य सामग्रीसाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा, सीसीटीव्ही कॅमेºयासाठी २२ लाखांचा, तसेच सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आणि जिल्हा स्त्री आणि बालरुग्णालयाच्या आवश्यक जागेसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांना दिल्या. त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. भटकर, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड आदींची उपस्थिती होती.
पथकाकडून औषधींची तपासणी
आरोग्य विभागातर्फे कालबाह्य औषधी प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधी साठ्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत भांडार विभागाची चौकशी केली असता औषधी साठ्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आणखी ९० लाखांची औषधी कालबाह्य झाल्याचे समोर आले. शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनामा केला आहे. ही योग्यरीत्या झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात औषधी साठ्याची कल्पना असूनही त्याकडे अधिकारी-कर्मचाºयांनी कानाडोळा केल्याचे दिसते.
राज्यस्तरावरून औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये आवश्यकता नसलेली तर काही गरजेपेक्षा जास्त औषधांचा पुरवठा झाल्याचे समजते. त्यामुळे ही औषधी वापराविना पडून राहिली. ही वेळीच संबंधित पुरवठादारास परत करून आवश्यक असलेली औषधी मागविता आली असती; परंतु अधिकाºयांनी त्याकडे लक्ष दिले नाही. याबरोबर औषधांचा साठाही योग्यरीत्या केला जात नसल्याचे दिसते. त्यातून कोणती औषधी आहेत, उपलब्ध नाही, याची माहिती घेण्यात कुचराई होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
काही औषधीच कालबाह्य झाली असल्याची कबुली स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. त्यामुळे औषधी साठ्याच्या बाबतीत हलगर्जीपणा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
‘लोकमत’ने प्रकरण समोर आणल्यानंतर आता आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली असून, औषधांची तपासणी करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. या पथकातील सदस्यांकडून औषधी साठ्याची तपासणी केली जात आहे. पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील साठ्याची पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन वर्षे दुर्लक्ष
लाखो रुपयांची औषधी वापराविना पडून आहे, याची कल्पना असूनही आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाºयांनी कानाडोळा केला. औषधी साठ्याकडे दोन वर्षे दुर्लक्ष केल्याने तब्बल लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाली. याचा फटका कुठेतरी सर्वसामान्यांनाच बसणार आहे. आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने ही वेळ आल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.

Web Title:  Deputy Director of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.