उपमहापौर, सभापती पदासाठी चुरस
By Admin | Published: May 31, 2016 11:15 PM2016-05-31T23:15:53+5:302016-05-31T23:20:06+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ ८ जून रोजी उपमहापौरांची निवड केली जाणार आहे़
महानगरपालिका : उपमहापौर पदासाठी चाँदपाशा घावटी, किशोर राजुरे, असगर पटेल, लक्ष्मण कांबळे दावेदाऱ़़
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ ८ जून रोजी उपमहापौरांची निवड केली जाणार आहे़ तर स्थायी समितीच्या सभापतीची निवड ९ जून रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे़ गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता इच्छुकांचा नेत्यांकडे रेटा वाढला आहे़ शिवाय, प्रभाग समितीचे चार सभापती, परिवहन सभापतींचीही निवड ९ जून रोजी होणार आहे़
उपमहापौर कैलास कांबळे यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला होता़ १२ मे रोजी नव्या महापौरांची निवड झाल्यावर स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी २४ मे रोजी विशेष सभा झाली़ विशेष सभेत स्थायी समितीच्या नवीन ८ सदस्यांची निवड करण्यात आली़ निवडीनंतर लागलीच स्थायी समितीच्या सभापतीचा निवड कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र आठ दिवसांनतर सभापती निवडीसाठी स्थायी समितीची विशेष बैठक ९ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे़ महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ स्थायी समितीत नव्याने सदस्य म्हणून आलेल्या काँग्रेसच्या दिग्गजांमध्ये चुरस लागली आहे़ माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडे इच्छुकांचे खेटे वाढले आहेत़ त्याचबरोबर प्रभाग समितीचे चार सभापती, परिवहन सभापतींची निवडही ९ जून रोजीच केली जाणार आहे़ उपमहापौरपदासाठी चाँदपाशा घावटी, अॅड़ किशोर राजुरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, असगर पटेल हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत़ तर स्थायी समितीच्या सभापतीसाठी प्रा़ राजकुमार जाधव, रविशंकर जाधव, सुरेश पवार, माजी महापौर स्मिता खानापुरे हे दावेदार असल्याचे सांगितले जात आहे़ स्थायी समिती सभापती पदासाठी प्रा़राजकुमार जाधव, रवीशंकर जाधव, माजी महापौर स्मिता खानापुरेंचेही नाव चर्चेत आहे़ परिवहन सभापतीपदी विक्रांत गोजमगुंडे यांना दुसऱ्यांदा संधी न मिळाल्यास गिरीष पाटील किंवा पंडीत कावळे यांना संधी मिळू शकते़
४(प्रभाग समितीवर महिलांना संधी?- हॅलो २ वऱ़़)