उपमहापौर, स्थायी समितीसाठी स्पर्धा

By Admin | Published: May 8, 2016 11:26 PM2016-05-08T23:26:59+5:302016-05-08T23:46:13+5:30

लातूर : लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, उपमहापौर कैलास कांबळे यांनीही राजीनामा दिला आहे़

Deputy Mayor, Competition for Standing Committee | उपमहापौर, स्थायी समितीसाठी स्पर्धा

उपमहापौर, स्थायी समितीसाठी स्पर्धा

googlenewsNext


लातूर : लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, उपमहापौर कैलास कांबळे यांनीही राजीनामा दिला आहे़ त्यामुळे उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली आहे़ त्याचबरोबर गटनेत्याचीही नवीन निवड केली जाणार आहे़ माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांना गटनेतेपदाची संधी दिली जाणार असल्याची मनपात चर्चा आहे़
उपमहापौरपदासाठी प्रभाग समितीचे सभापती चाँदपाशा घावटी, किशोर राजुरे, रविशंकर जाधव यांची नावे चर्चेत आहेत़ स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी प्रभाग समितीचे माजी सभापती प्रा़ राजकुमार जाधव, रविशंकर जाधव, अजगर पटेल यांच्या नावाची चर्चा आहे़ महापौरपदाची संधी हुकल्याने अजगर पटेल यांना सभापतीपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे़
आगामी मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्व समाजघटकांना संधी देण्यासाठी काँग्रेसची खेळी आहे़ त्यानुसार प्रभाग समितीच्या सभापतींच्याही नवीन निवडी होणार आहेत़ विक्रांत गोजमगुंडे यांच्याकडेच सभापतीपद राहण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
ाहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी मनपातील गटनेता बदलाचे संकेत दिले़ यावेळी उपस्थित गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी त्यास होकार दर्शविला आहे़ त्यामुळे काँग्रेसच्या गटनेतेपदी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांची निवड निश्चित असल्याची चर्चा आहे़ शिवाय, माजी उपमहापौर सुरेश पवार, अ‍ॅड़ समद पटेल यांची नावे चर्चेत आहेत़ प्रभाग समितीच्या सभापती निवडीत महिलांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

Web Title: Deputy Mayor, Competition for Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.