१५ हजार रुपये लाच घेताना भूमी अभिलेख विभागाचा उपअधीक्षक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:06 AM2021-02-16T04:06:21+5:302021-02-16T04:06:21+5:30
जयदीप मधुकर शितोळे (३२, रा. पैठण) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांना ...
जयदीप मधुकर शितोळे (३२, रा. पैठण) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांना वाटणीपत्रानुसार बीडकिन येथे १२९. ८ चौरस फूट जमीन मिळाली होती.
या जमिनीची नोंद सिटी सर्व्हे रजिस्टरमध्ये करावी यासाठी तक्रारदार यांनी पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर काय कार्यवाही केली हे पाहण्यासाठी आज तक्रारदार उपअधीक्षक शितोळे यास भेटले असता त्याने २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना युनिटचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांनी कर्मचाऱ्यासह लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा तडजोड करीत आरोपीने तक्रारदार यांना १५ हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. यावेळी त्यांच्याकडून लाचेची रक्कम घेताच आरोपीला रंगेहात पकडले.