देसलपर गुंतली पाटीदार मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार
By Admin | Published: August 25, 2014 12:00 AM2014-08-25T00:00:40+5:302014-08-25T00:25:22+5:30
औरंगाबाद : देसलपर गुंतली पाटीदार युवक मंडळातर्फे आज सकाळी पाटीदार भवनात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद : देसलपर गुंतली पाटीदार युवक मंडळातर्फे आज सकाळी पाटीदार भवनात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. ‘बात’ उन्हीं की होती हैं... जिन में कोई ‘बात’ होती हैं, अपनी कड़ी मेहनत और कर्तृत्व पर आपने दुनिया जिती हैं’ अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्र्यांनी देसलपर गुंतली पाटीदार समाजाचा गौरव केला.
अगदी सकाळीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटीदार भवनात मोठी गर्दी झाली होती. विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कंजुषी न करता हे सारे जण टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. त्यामुळे कार्यक्रम अगदी जिवंत वाटला. कार्यक्रमात रंगत येत गेली.
आपल्या शेरशायरीयुक्त भाषणात शालेय शिक्षणमंत्र्यांनी गरजेनुसार घेतलेल्या शिक्षणामुळे कशी भरभराट होते, हे स्वानुभवावरून सांगितले. ‘डर मुझे भी लगा फासला देखकर... मैं बढ़ता गया रास्ता देखकर’ असा शेर यासंदर्भात त्यांनी सादर केला. अगदी प्लंबर, मेकॅनिक, कारपेन्टरसुद्धा आता महिन्याला लाख लाख रु. कमवू शकतात, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. राज्य शासनाने केलेल्या अनेक सुधारणावादी उपक्रमांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
प्रारंभी, भावेशभाई पटेल यांनी राजेंद्र दर्डा यांचा परिचय करून दिला. शिवजीभाई पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. खुशाल बाबूलाल पटेल, धवन पटेल, चेतन तेलानी, पीयूष भावेश पटेल, जगदीश पटेल, प्रीती पटेल, नीलेश पटेल, तरुण पटेल आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिंमतभाई पटेल, केशवभाई पटेल, प्रवीण पटेल, दिनेश पटेल व गोपालभाई पटेल आदींची मंचावर उपस्थिती होती. होमगार्ड निदेशक संतोष लखोटिया यांचे स्वागत यावेळी गोपालभाई पटेल यांनी केले. सूत्रसंचालन संजय पटेल यांनी केले, तर आभार लक्ष्मीकांत पटेल यांनी मानले. विविध ठिकाणांहून हे गुणवंत आले होते. परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.