पालिकेत काम करण्याची राहिली नाही इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:33 PM2017-11-16T23:33:43+5:302017-11-16T23:33:48+5:30
सातारा- देवळाई नगर परिषदेच्या कर्मचा-यांना महापालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या प्रकरणावरून आयुक्त डी. एम. मुगळीकर अस्वस्थ झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेच्या कर्मचा-यांना महापालिकेच्या आस्थापनेवर कायम करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या प्रकरणावरून आयुक्त डी. एम. मुगळीकर अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी मनपात काम करण्याची आपली इच्छा नाही, अशा शब्दांत ते ज्यांच्यामुळे पालिकेत आले, त्या लोकप्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
बुधवारच्या सर्वसाधारण सभेत सातारा- देवळाईच्या ४३ कर्मचाºयांना मनपा आस्थापनेवर कायम करण्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश महापौरांनी दिल्यामुळे आयुक्तांना ती बाब खटकली. त्यांनी महापौरांच्या निर्णयाला चुकीचे असल्याचे दाखविण्यासाठी हातवारे केले. त्यानंतर महापौरांनी विभागीय आयुक्तांमार्फ त या (पान ५ वर)