‘आधार’ असतानाही परीक्षेपासून केले निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:16 AM2018-07-09T01:16:16+5:302018-07-09T01:16:38+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अभियंतापदासाठी आयोजित पूर्व परीक्षेत परीक्षार्र्थींकडे आधार कार्डसह इतर पुरावे असतानाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप परीक्षार्र्थींनी केला.

Despite the 'Aadhar, candidates did not allow to attend the exam | ‘आधार’ असतानाही परीक्षेपासून केले निराधार

‘आधार’ असतानाही परीक्षेपासून केले निराधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अभियंतापदासाठी आयोजित पूर्व परीक्षेत परीक्षार्र्थींकडेआधार कार्डसह इतर पुरावे असतानाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप परीक्षार्र्थींनी केला. परीक्षार्र्थींकडे आधारसह बँक पासबुक, महाविद्यालयाचे ओळखपत्र असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र परीक्षेचे नियोजन करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रवेशासाठी आयोगाचे निर्देश काटेकोरपणे पाळण्यात आल्याचे स्पष्ट केले.
एमपीएससीतर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन शहरातील १४ केंद्रांवर केले होते. परीक्षेसाठी विद्यार्थी केंद्रांवर हजर झाले असता, त्यांना दोन ओळखपत्रांची मागणी करण्यात येत होती. मात्र अनेकांनी केवळ आधार हेच ओळखपत्र म्हणून सोबत आणले होते. तसेच काही विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स होती. या ओळखपत्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याचा फटका १४ केंद्रांवरील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसला असल्याची माहिती परीक्षार्थी सचिन राठोड याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या परीक्षेची तयारी दोन ते तीन वर्षांपासून केलेली असताना त्यांना ऐनवेळी दोन ओळखपत्र मागितल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या परीक्षेसाठी ४ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र दाखल केले होते. यातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३ हजार २३१ एवढी आहे. तर अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या १,२७५ आहे. एकूण परीक्षार्र्थींपैकी ७१.७० टक्के विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागील तीन परीक्षांपासून परीक्षार्र्थींना दोन ओळखपत्रे दाखविल्याशिवाय परीक्षा केंद्रांत प्रवेश न देण्याचा नियम केला आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकीच दोन ओळखपत्र असणे आवश्यक आहे. दोन ओळखपत्र असणाºया विद्यार्थ्यांना कोठेही अडविण्यात आलेले नाही. मात्र ज्यांच्याकडे एकच ओळखपत्र होते, त्यांना परीक्षा केंद्रांत प्रवेश देण्यात आलेला नाही.
- रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन

 

Web Title: Despite the 'Aadhar, candidates did not allow to attend the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.