श्वेता जाधवच्या झुंजार खेळानंतरही महाराष्ट्र पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:02 AM2017-12-09T01:02:43+5:302017-12-09T01:03:07+5:30
डावखुरी स्फोटक फलंदाज श्वेता जाधव हिच्या झुंजार खेळीनंतरही महाराष्ट्राला बडोदा येथे सुरू असलेल्या सीनिअर महिलांच्या वनडे क्रिकेट स्पर्धेत आज उत्तर प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला.
औरंगाबाद : डावखुरी स्फोटक फलंदाज श्वेता जाधव हिच्या झुंजार खेळीनंतरही महाराष्ट्राला बडोदा येथे सुरू असलेल्या सीनिअर महिलांच्या वनडे क्रिकेट स्पर्धेत आज उत्तर प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकात ८ बाद १९९ धावा केल्या. त्यांच्याकडून साक्षी माथूरने ९८ चेंडूंत ७ चौकारांसह ६९ व निशू चौधरीने ४५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून माया सोनवणे हिने ३४ धावांत ३ गडी बाद केले. प्रियंका गारखेडे, तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा संघ ५0 षटकांत ९ बाद १२७ धावा करू शकला. महाराष्ट्राकडून औरंगाबादची आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता जाधव हिने ११८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ६३ धावांची झुंजार खेळी केली. कर्णधार स्मृती मानधना व शीतल शिंदे यांनी प्रत्येकी १२ धावा केल्या. उत्तर प्रदेशकडून अपूर्वा भारद्वाज व राक्षी कनोजिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. झुंजार अर्धशतकी खेळी करणाºया श्वेता जाधव हिला प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.