‘लम्पी’ नियंत्रणात तरीही जनावरांचे मृत्यूसत्र थांबेना, तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात

By विजय सरवदे | Published: November 2, 2022 08:17 PM2022-11-02T20:17:21+5:302022-11-02T20:18:01+5:30

जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Despite the 'lumpi' control, the death of animals did not stop in Aurangabad | ‘लम्पी’ नियंत्रणात तरीही जनावरांचे मृत्यूसत्र थांबेना, तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात

‘लम्पी’ नियंत्रणात तरीही जनावरांचे मृत्यूसत्र थांबेना, तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात

googlenewsNext

- विजय सरवदे

औरंगाबाद : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे लम्पी साथरोग आटोक्यात आली असली तरी बाधित पशुधनाचे मृत्यूसत्र थांबायचे नाव घेत नाही. सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू असून,यापैकी ९९ जनावरांची परिस्थिती गंभीर आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘लम्पी’ग्रस्त ३३२ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने रोज ४-५ जनावरांचा मृत्यू होत आहे,ही चिंतेची बाब आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की,जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी मनुष्यबळ कमी पडल्यामुळे त्या त्या पशुचिकित्सालयांमार्फत ‘डिप्लोमा’धारकांकडूनही लसीकरण केले जात आहे. त्यांना प्रती लस ५ रुपये याप्रमाणे मोबदला दिला जातोय. दरम्यान, जनावरांचे लसीकरण झाल्यानंतर पशुपालक चिंतामुक्त होत आहेत. जनावरांना होणाऱ्या त्रासाकडे बारीक लक्ष ठेवल्यास वेळीच उपचार मिळून ते रोगमुक्त होऊ शकतात. पण,असे होताना दिसत नाही. त्यामुळेच मृत्यूसत्र थांबत नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ६७३ बाधित जनावरांपैकी उपचार मिळाल्यामुळे तब्बल ३ हजार २९७ जनावरे रोगमुक्त झाली असून सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. जि.प. पशुसंवर्धन विभागाने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमुळे रोगमुक्त होणाऱ्या जनावरांचे प्रमाण समाधनकारक आहे.

तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात
शासनाने लम्पी साथरोगामुळे दगावणाऱ्या पशुधनासाठी नुकसानभरपाईपोटी मोबदला देऊन पशुपालकांना दिलासा दिला जात आहे. मात्र,६०-७० हजारांचा बैैल अथवा गाय दगावल्यास २५-३० हजार एवढा तुटपुंजा मोबदला दिला जातोे. त्यामुळे पशुपालक संकटात सापडले आहेत. मोबदल्याच्या प्रस्तावासाठी पंचनामा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. मात्र,तहसीलदार,तलाठी,ग्रामसेवक या सरकारी अधिकाऱ्यांसमक्षच पंचनामा होणे अपेक्षित असून हे अधिकारी अनेकदा त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतात. परिणामी,पंचनाम्यासाठी मोठा विलंब होतो. त्यामुळे १४७ मोबदल्याचे प्रस्ताव रखडले आहेत. आजवर अनुदानाचे १८५ प्रस्ताव निकाली निघाले असून जवळपास ३५ लाखांपर्यंत नुकसानीचा मोबदला वितरित करण्यात आला आहे.

Web Title: Despite the 'lumpi' control, the death of animals did not stop in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.