बजाजनगरात झाडांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:02 AM2021-03-27T04:02:12+5:302021-03-27T04:02:12+5:30

-------------------- सिमेन्स चौकातील गतिरोधकाची दुरवस्था वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील सिमेन्स चौकात असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला ...

Destruction of trees in Bajajnagar | बजाजनगरात झाडांची नासधूस

बजाजनगरात झाडांची नासधूस

googlenewsNext

--------------------

सिमेन्स चौकातील गतिरोधकाची दुरवस्था

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील सिमेन्स चौकात असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनाच्या वर्दळीमुळे गतिरोधकाचा काही भाग जमीनदोस्त झाला असून खड्डेही पडले आहेत. या खड्ड्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

--------------------------

बजाजनगरात रसवंती चालकांचे अतिक्रमण

वाळूज महानगर : बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिर, जयभवानी चौक तसेच विविध ठिकाणी रसवंती सुरु करण्यात आल्या आहेत. या रसवंत्यासाठी व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यावरील फूटपाथवर कब्जा केला आहे. या शिवाय रस पिण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करीत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. रसवंती चालकाच्या या अतिक्रमणामुळे ये-जा करणाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

-------------------------

पंढरपुरात विजेच्या लपंडावामुळे ग्राहक त्रस्त

वाळूज महानगर : पंढरपुरात सतत विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून वेळी-वेळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे व्यावसायिक व नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या उन्हाळा सुरु असून खंडित वीजपुरवठ्यामुळे घरातील पंखे, कुलर, एसी शोभेची बाहुले बनली असल्याची ओरड ग्राहकातून होत आहे.

-----------------------

एकतानगरात मोकाट कुत्र्यांची दहशत

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगरात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. हे मोकाट कुत्रे रस्त्याने ये-जा करणाऱ्या कामगार, लहान मुले व नागरिकांच्या अंगावर धावून जात असतात. रात्री कंपनीतून घरी परतणाऱ्या कामगारांच्या दुचाकीचा पाठलाग करीत असल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत. या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकातून होत आहे.

---------------------

Web Title: Destruction of trees in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.