तोतया निरीक्षक अटकेत

By Admin | Published: July 24, 2016 12:24 AM2016-07-24T00:24:31+5:302016-07-24T00:56:07+5:30

औरंगाबाद : दुकानदार, हातगाडीचालकांना दमदाटी करून व्यवसाय करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या महानगरपालिकेच्या तोतया इमारत निरीक्षकाला नागरिकांनी पकडून जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले

Detective Detector | तोतया निरीक्षक अटकेत

तोतया निरीक्षक अटकेत

googlenewsNext


औरंगाबाद : दुकानदार, हातगाडीचालकांना दमदाटी करून व्यवसाय करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या महानगरपालिकेच्या तोतया इमारत निरीक्षकाला नागरिकांनी पकडून जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वेपटरीजवळ घडली.
ईश्वर हिरामण सातदिवे (४५, रा. रेणुकानगर, गारखेडा, मूळ रा. चिंचोली, ता. खुलताबाद) असे तोतया इमारत निरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शिवाजीनगरमधील बी. सेक्टर येथे राहणारे गजानन बसैये हे शिवाजीनगर रेल्वेपटरीजवळ वडापाव विक्रीची हातगाडी लावून व्यवसाय करतात. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास गजानन बसयै हे नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय करीत असताना सफारी सूट घातलेला आरोपी त्यांच्या हातगाडीवर आला. यावेळी त्याने स्वत: महानगरपालिकेचा इमारत निरीक्षक असल्याचे त्यांना सांगितले. तुम्ही येथे अनधिकृत हातगाडी लावली आहे. त्यामुळे तुम्हाला एक हजार रुपये दंडाची पावती फाडावी लागेल, असे तो म्हणाला.
यावेळी बसैये यांच्याकडून पाचशे रुपये घेतले, मात्र त्यांना पावती दिली नाही. त्यानंतर तो हातगाडीशेजारील एका गॅरेजवर गेला. या गॅरेजचे मालक आनंदराव देसाई हे दुकानात बसलेले होते. यावेळी मी या एरियाचा इमारत निरीक्षक आहे. तुम्ही काय समजता, मी कोण आहे, तुम्हाला येथे दुकान चालवायचे असेल तर मला रोख दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे धमकावण्याच्या स्वरात तो देसाई यांना म्हणाला.
यावेळी देसाई यांच्या शेजारील अन्य दुकानदारांना त्याच्याबद्दल संशय आला, त्यामुळे त्यांनी तात्काळ या भागाचे नगरसेवक यांच्या कार्यालयात फोन करून तेथे काम करणाऱ्या अमोल पाटे यांना बोलावून घेतले. गॅरेजचालकांसह दुकानदारांकडून पैसे उकळणारा इमारत निरीक्षक खरा आहे अथवा तोतया याबाबत खात्री करण्यास सांगितले. तेव्हा उपस्थितांनी आरोपीचे छायाचित्र मोबाईलमध्ये घेऊन महानगरपालिका कार्यालयात बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाठवून दिले. पदाधिकाऱ्यांनी याबाबत पडताळणी केल्यानंतर हा इमारत निरीक्षक तोतया असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी लोकांनी त्यास पकडून ठेवले आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने स्वत:चे नाव ईश्वर सातदिवे असल्याचे सांगितले. याप्रकरणी बसैये यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी सातदिवे याने चार महिन्यांपूर्वी खाजगी सुरक्षारक्षकाची नोकरी सोडली. तीन दिवसांपासून तो अधिकारी, कर्मचाऱ्यांना न कळू देता पथकासोबत फिरत होता. कर्मचारी रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना काय बोलतात, त्यांच्याशी कसे वागतात, याचा त्याने जवळून अभ्यास केला.
४त्यानंतर त्याच्या डोक्यात ही फसवणुकीची कल्पना आली. त्यानंतर त्याने इमारत निरीक्षक असल्याची बतावणी करून पैसे उकळण्यास सुरुवात केली. अखेर तो पकडल्या गेला.

Web Title: Detective Detector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.