अट्टल गुन्हेगारांची टोळी ताब्यात
By Admin | Published: September 14, 2014 11:45 PM2014-09-14T23:45:34+5:302014-09-14T23:46:37+5:30
बीड : गेवराई तालुक्यातील मातोरी येथे ट्रक अडवून चालकाजवळील ४० हजार रुपयांची रक्कम बळजबरी घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी मोठ्या शिताफीने पकडले.
बीड : गेवराई तालुक्यातील मातोरी येथे ट्रक अडवून चालकाजवळील ४० हजार रुपयांची रक्कम बळजबरी घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी मोठ्या शिताफीने पकडले. त्यांना चकलंबा पोलिसांच्या स्वाधीन केले़
१ आॅगस्ट २०१४ रोजी आष्टी तालुक्यातील शेडाळा येथील रघुनाथ नवनाथ सरपते हे भूईमुगाच्या शेंगाने भरलेला ट्रक गेवराई तालुक्यातील मातोरी मार्गावरुन घेऊन जात असताना मोटारसायकल (एमएच-१२ एफएन-८७३३) वर चौघे आले. ट्रकला गाडी अडवून सरपते यांच्या जवळील ४० हजार रुपयांची रक्कम बळजबरीने घेऊन गेले. या प्रकरणी सरपते यांनी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते चौघे शिंगारवाडी येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने संदिप अशोक गाडे (रा. बोरगाव, ता. शिरुर), प्रविण बळीराम उगले (रा. हाजीपुर, ता. शिरुर), सुशिल हरिभाऊ कोळेकर (रा. शिंगावाडी, ता. शिरुर) व अशोक रामनाथ हिंगे (रा.मुंगसवाड, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. यापूर्वी यातील काही आरोपींवर रोडरॉबरीचे गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, स्थागुशाचे पोनि सी.डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भारत राऊत, हेड कॉन्स्टेबल संजय खताळ, मोहन क्षीरसागर, बबन राठोड, मारोती सानप, पोना गणेश दुधाळ, बाबासाहेब सुरवसे, विलास ठोंबरे, चालक रशीद खान यांनी केली. (प्रतिनिधी)