राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:02 AM2021-02-23T04:02:17+5:302021-02-23T04:02:17+5:30
या बैठकीत महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, रद्द करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजना पुन्हा चालू ...
या बैठकीत महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, रद्द करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजना पुन्हा चालू करणे, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक यांचे कालबद्ध पदोन्नती तसेच वेतनत्रुटीचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीत नितीन काकडे (विवेकानंद महाविद्यालय) यांची विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर पंकज पंडीतराव पाटेकर (देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद ) यांची विभागीय महासचिव म्हणून नियुक्ती आली.
या बैठकीस विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभुवन, कार्याध्यक्ष - गजानन काळे, कोषाध्यक्ष - आनंदा अंकुश, उपाध्यक्ष - संदीप हिवरकर, अविनाश पाटील, प्रविण पाटील, मारुती धोत्रे, चोपावार सर, महेश निलजे, गोपाळ सोनवणे, डॉ. मुरलीधर हेडव, अन्वर खान, प्रकाश उपासने, सतिष माहोरे, संतोष ठाले, महिला प्रतिनिधी - रुपाली सहारे, महासंघाचे विभागीय अध्यक्ष गणेश तांदळे, उपाध्यक्ष नितीन काकडे, महासचिव पंकज पाटेकर, एस. के. पवार, एस. पीपवार, डी. एस. जाधव, किरण साळुंके, रामनाथ बोबडे, रमेश काळे, भाऊसाहेब भोसले, बी. यु. काळे, मनिष दुधाटकर, राजेंद्र दारवंटे, राजेंद्र तुपे, कृष्ण वनगुजर, एस. बी. इंगळे, सुनिल मडके, संगिता मुळे, उज्ज्वला एखंडे, माधवी अवस्थी तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.