विकास आराखडा; महापौरांची संमती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:03 AM2017-08-05T01:03:42+5:302017-08-05T01:03:42+5:30
शहर विकास आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, हे प्रकरण पुढे चालविण्यासाठी विद्यमान महापौर बापू घडमोडे यांना शपथपत्र दाखल करणे बंधनकारक होते. अचानक घडमोडे यांनी शपथपत्रावर सही केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहर विकास आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, हे प्रकरण पुढे चालविण्यासाठी विद्यमान महापौर बापू घडमोडे यांना शपथपत्र दाखल करणे बंधनकारक होते. मागील काही दिवसांपासून घडमोडे शपथपत्रावर सह्या करण्यास आणि प्रकरण पुढे चालविण्यास असमर्थता दर्शवीत होते. अचानक घडमोडे यांनी शपथपत्रावर सही केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात महापौर म्हणून आपण प्रकरण पुढे चालविण्यास तयार असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
शहर विकास आराखड्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबर २०१६ मध्ये दाखल करण्यात आली आहे. यात विद्यमान महापौर घडमोडे यांना शपथपत्र सादर करणे बंधनकारक होते. घडमोडे यांच्यापूर्वी महापौरपदावर असलेले त्र्यंबक तुपे यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विकास आराखड्यावर स्वाक्षरीच केलेली नाही. त्यानंतर ओम प्रकाश बकोरिया यांनी सर्वोच्च न्यायालयात मनपा प्रशासन म्हणून प्रकरण पुढे नेण्यास असमर्थता दर्शविली. तुपे यांचा कार्यकाळ संपल्यावर घडमोडे या पदावर विराजमान झाले. ते विकास आराखड्याच्या शपथपत्रावर सही करतात किंवा नाही, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. अखेर घडमोडे यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथ सादर केले असून, तुपे यांनी केलेल्या निर्णयाशी आपण सहमत असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात (पान २ वर)